गृहमंत्रिपद अनेकांना नको आहे- शरद पवार

0
112

नगर प्रतिनिधी । आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. खातेवाटपही आठ दिवसांपूर्वीच ठरले आहे. मात्र गृहमंत्रिपद नको म्हणणारेच जास्त असल्याचे त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पवार गुरुवारी नगरला आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी पवार म्हणाले की, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. या विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने काही नेत्यांमध्ये नाराजी आहे. खातेवाटपाही चढाओढ असल्याचे बोलले जात आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता पवार म्हणाले, मखातेवाटपावरून आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही. गृहखाते आम्हीच अनेकांना देत होतो, पण आमच्याकडे अनेकजण नको म्हणत होते. एका पक्षाचे सरकार असताना शपथविधी झाल्यानंतर दोन दिवस खातेवाटप होत नव्हते. आता तर राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले. राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने प्रत्येकाकडे पाच ते सहा खाती द्यावी लागतील.

या वेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दादा कळमकर, माजी आमदार चंद्रशेखर घुले घनश्याम शेलार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here