काँग्रेस अनुसुचीत जाती विभागाची जिल्हा व तालुका कार्यकारीणी जाहीर

0
108

संगमनेर प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाच्या अनुसुचीत जाती विभागाची जिल्हा व तालुका कार्यकारिणी येथील भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या अतिथीगृहात झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली.

एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेसच्या एससी विभागाच्या जिल्हा व तालुका कमिटीची निवड करण्यात आली. या बैठकीस एससी विभागाचे राज्य उपाध्यक्ष राहुल दिवे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, नगर शहराध्यक्ष नाथा अल्हाट, बंटी यादव, शिवाजी जगताप, लक्ष्मण घुमरे, संजय भोसले, अनिल भोसले, बाबा खरात आदी उपस्थित होते.

याप्रसंगी संगमनेरच्या तालुकाध्यक्षपदी सतीश वाघमारे, मनोज बिडवे (जिल्हा उपाध्यक्ष, कोपरगाव), विजय आढाव (जिल्हा सरचिटणीस, संगमनेर), उमेश साठे (जिल्हा उपाध्यक्ष, नगर), भाऊसाहेब भोसले (तालुका उपाध्यक्ष, राहुरी), सुधीर भोसले (जिल्हा समन्वयक, राहुरी), कमलेश गायकवाड (जिल्हा कार्याध्यक्ष, नेवासे), कार्लेस साठे (जिल्हा उपाध्यक्ष, श्रीरामपूर), गौतम सूर्यवंशी (उपशहराध्यक्ष नगर), अण्णासाहेब गायकवाड (महासचिव नगर शहर), विजय गायकवाड (संघटक, नगर), सुहास साठे (कार्याध्यक्ष, नगर), जयंत पटेकर (शहर सचिव, नगर), मधुकर भोजणे (तालुका उपाध्यक्ष, संगमनेर) यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमात निवडीच्या पत्रांचे वितरण अंभोरे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन बंटी यादव यांनी केले. राजेंद्र वाघमारे यांनी प्रास्ताविक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here